You are currently viewing दि.१२ जून रोजी कोरोना : वास्तव आणि अवास्तव या विषयावर ऑनलाईन व्याख्यान

दि.१२ जून रोजी कोरोना : वास्तव आणि अवास्तव या विषयावर ऑनलाईन व्याख्यान

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने ग्राहक जागृती बरोबरच इतर महत्त्वाच्या विषयांवर ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करीत आहोत. या व्याख्यानमालेचे पहिले व्याख्यान ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक १२ जून रोजी रात्री ठिक ८ ते ९ या वेळेत गुगल मिट ॲपवर आयोजित करण्यात आले आहे.

मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाविषयी सर्वांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना महामारी आणि वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना: वास्तव आणि अवास्तव’ या विषयावर जनजागृती बरोबरच प्रबोधनाच्यादृष्टीने डॉ.राजेंद्र पाताडे, वैभववाडी, जिल्हाध्यक्ष-डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
https://meet.google.com/afi-jgnu-vbn
या गुगल मिटच्या लिंकवरून व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर, सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा