दिल्ली :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हालाविण्यात आले आहे. यांच्यात कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागल्यानंतर कमलनाथ यांना ताप व सर्दी खोकला zalav होता. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच त्यांचे पुत्र आणि खासदार नकुल नाथ हे दिल्लीत हजर झाले आहेत. कोरोना काळातही कलमनाथ सक्रिय आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली होती. कोरोनाच नवा स्ट्रेन हा भारतीय स्ट्रेन नसल्याचे सांगितल्यावर कमलनाथ यांच्यावर टीका झाली होती. केंद्रात अनेक मंत्रालयाचा कारभार सांभाळलेले कमलनाथ 2018 मध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र ज्योतिरादित्य यांच्या बंडखोरी नंतर एका वर्षात त्यांचे सरकार पडले होते.