नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक

नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक

*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांचे आवाहन*

सावंतवाडी :

कोरोना महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस जिल्ह्यात शहरातआपल्या गावागावांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांनी आता खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे. यामुळे शासनाला वेळोवेळी लॉकडाऊन करून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपायोजना नाईलाजाने कराव्या लागतात याला नागरिक म्हणून आपणच जबाबदार आहोत. कोरोना महामारीचा संसर्ग आता प्रत्येक नागरिकाने घराच्या बाहेर पडल्यानंतर पूर्ण नाक व तोंड झाकून साधे कापडी मास्क न वापरता जाड किंवा A95 मास्क पूर्णपणे वापरून अत्यावश्यक माल खरेदी करतेवेळी, दुकानात तसेच मासे, मटण, दूध विक्री केंद्र, मेडिकल स्टोअर, रुग्णालयात व दवाखान्यामध्ये तसेच किराणामाल बेकरीमध्ये, भाजी मार्केटमध्ये वस्तू खरेदी करतेवेळी त्याचप्रमाणे मंदिर, मशीद व चर्च मध्ये जाताना पूर्णपणे खबरदारी घेतली पाहिजे. तसेच आपल्या मित्रांबरोबर, शेजारीवर्ग व नातेसंबंधातील व्यक्तींबरोबर तसेच व्यापांऱ्याबरोबर गप्पागोष्टी किंवा चर्चा करत असताना पूर्णपणे नाका-तोंडाला मास्क लावून बोलावे व शक्य झाल्यास सोशल डिस्टंसिंग पाळून आपली व आपल्या कुटुंबातील व्यक्तींची खबरदारी घ्यावी.

 

एखाद्या वेळी आपण एकटे असताना किंवा गाडीवरून आपण स्वतः एकटे जात व असताना किंवा दुकानात कोणी ग्राहक नसताना दुकान मालक एकटे असताना असे मास्क थोडेफार खाली केले तर चालते. जेणेकरून हा कोरोना महामारीचा संसर्ग आपल्या घरात व कुटुंबामध्ये वयस्कर व्यक्तींना तसेच आपल्याला या संसर्गाची बाधा होऊन आपल्या व आपल्या कुटुंबातील जीवितास धोका होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. आपण अशा शासनाच्या नियमांचे पालन न केल्यास ह्या कोरोना महामारी चा संसर्गाचा धोका कित्येक नागरिकांना झाला असून त्यामुळे कित्येक नागरिकांना मनस्ताप होऊन तसेच अनेक कुटुंबातील व्यक्ती तरुण व वयस्कर नागरिक यामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. आपण बोलत असताना तोंडातून थुंकीचे सूक्ष्म थेंब आपल्या मास्क नाका-तोंडाच्या खाली राहिल्यास असे अदृश्य सूक्ष्म थेंब आपल्या तोंडामध्ये जाऊन आपल्याला नकळत कोरोनाची बाधा होते. व तसेच समोरील व्यक्ती कोरोना बाधित असेल हे आपल्याला माहित नसते.

 

चोवीस तासानंतर आपल्याला थोडाफार बारीकसा थंडी ताप येऊन आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन ताप सर्दी च्या गोळ्या घेतो, त्यानंतर असा रुग्ण घरातील व्यक्तींबरोबर मिक्स झाल्यानंतर दोन-चार दिवस ताप थांबल्यानंतर खोकला व दम तसेच थोडा फार बारीक ताप यायला सुरुवात होऊन कुठले पदार्थ खाताना चव न लागणे, कुठल्याही पदार्थाचा वास न येणे, संडास पातळ होऊन जुलाब होणे, अंग दुखून झोपून राहावे असे वाटणे अशी प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर आपण डॉक्टरांकडे धाव घेतल्यानंतर डॉक्टरांना कोरोना महामारी चा संसर्गाचा संशय आल्याने RTPCR टेस्ट करायला सांगतात. त्यातच दोन ते तीन दिवस हा रिपोर्ट यायला उशीर झाल्याने आपण घरातील व्यक्तींबरोबर मिक्स होऊन त्यांना सुद्धा या संसर्गाची बाधा नकळत करायला लागत असतो याचे भान आपल्याला नसते.

 

कोरोना महामारी चा संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांना त्यांची शुगर 150 ते 200 असते त्यांना कोरॉना संसर्ग झाल्यास ही शुगर ५०० ते ६०० होऊन रुग्णांना जीवितास धोका असतो त्याच प्रमाणे आता कोरोना संसर्गाचा स्तेन बदल्यामुळेअनेक रुग्णांचे देशात लालसर डोळे होऊन अनेकांची डोळे काढून टाकण्याची सुद्धा होत असून तसेच अनेक रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्यास रक्त जाडसर होऊन रक्तामध्ये गुठाई (स्लॉट) येऊन अनेकांना हृदयविकार तसेच मेंदूमध्ये गुठाई होऊन अनेकांना धोका निर्माण होऊन जीव गमवावा लागला आहे.

 

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच खासगी रुग्णालयांमध्ये आपल्या अशा रुग्णांना ऑक्सिजन बेड वेळ प्रसंगी मिळत नाही. वेळ प्रसंगी ऑक्सिजन लेवल 80 ते 85 पर्यंत खालावल्याने व्हेंटिलेटर बेड आवश्यक असल्यास मिळत नाही. लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच गोवा राज्यामध्ये सुद्धा असे बेड शासकीय रुग्णालयांमध्ये किंवा खासगी रुग्णालयांमध्ये मिळत नाहीत. तुमच्या नशिबाने खासगी रुग्णालयात ऑक्सीजन बेड मिळाल्यास दीड ते दोन लाख रुपये औषधोपचाराचा खर्च येतो तसेच व्हेंटिलेटर बेड आवश्यकतेनुसार मिळाल्यानंतर तीन ते साडेतीन लाख रुपये एवढा खाजगी रुग्णालयात खर्च येतो त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकलालसआपण आता कसे वागावे हे ठरवावे. अनेकदा यामध्ये गंभीर रुग्ण सुद्धा मृत्युमुखी पडत आहेत हे आपण सोशल मीडिया, टीव्ही मध्ये तसेच वृत्तपत्रात वाचूनही व बघूनही आपण बेफिकिरीने वागत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वःत काळजी घेऊन जबाबदारीने वागले पाहिजे, असे मसुरकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा