You are currently viewing वेड्यागत

वेड्यागत

माझं तुझं हे भेद,
नसतातच आपल्यात कधी.

पण तू कधितरी बोलून जातेस,
असंच वेड्यागत अधी मधी.

समजावलं कितीदा तुला,
वेगळेपण आपल्यात करू नकोस..

शरीर वेगळं असलं तरीही,
दोन जीव म्हणून कधी पाहू नकोस.

उगा बडबडलेले तुझे शब्द,
पुन्हा पुन्हा माघारी नाही येणार.

शब्दांचा बाण खोलवर रुततो,
उगा कोण काळजात मारून घेणार.

जिभेवरही आपल्या असावा ताबा,
केवळ सौंदर्यावर कोणी भाळत नाही.

गंध नसता खुलून दिसते चंपा,
रूप पाहून कुणी केसात माळत नाही.

(दिपी)✒️
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा