You are currently viewing आजपासून सेवा सप्ताहातून भाजपा सिंधुदुर्ग साजरा करणार पंतप्रधानांचा वाढदिवस..

आजपासून सेवा सप्ताहातून भाजपा सिंधुदुर्ग साजरा करणार पंतप्रधानांचा वाढदिवस..

 जिल्हाध्यक्ष मा.राजन तेली यांची माहिती

संपूर्ण भारतभरात “भाजपा सेवा सप्ताहा”च्या रुपात भारतीय जनता पार्टी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत आहे. या सेवा सप्ताहात भाजपातर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोविड-19 बाबत सर्व दक्षता घेत व शासकीय नियम व सूचना यांचे पालन करून अनेक ठिकाणी हा सप्ताह साजरा केला जाणार असल्याची माहिती भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली. ते म्हणाले की सिंधुदुर्ग भाजपा पक्ष माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा ७०वा वाढदिवस “सेवा सप्ताह” म्हणून साजरा करत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्तचे कार्यक्रम १४ से २० सप्टेंबर या कालावधीत विविध सेवाकार्याचे आयोजन करून साजरी करेल. या अभियानाची जबाबदारी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्याकडे देण्यात आली असून सर्व मंडल अध्यक्ष या जिल्हा कार्यक्रमाचे सह संयोजक आहेत. प्रत्येक मंडल स्तरावर बैठका घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंत्योदय सेवेचे काम सुरू केले आणि थोडक्याच कालावधीत त्यांनी वंचित, मागासलेले, शोषित आणि गरीबांना समर्पित अशा कित्येक योजना तळागाळातील जनतेपर्यंत थेट पोहोचवल्या. यावेळचा त्यांचा सत्तरावा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. या सेवा सप्ताहात प्रत्येक मंडलामध्ये भव्य रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड अभियान, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान, सागर किनारा स्वच्छता अभियान, मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर, रुग्णांना फळ वाटप आदी कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. कोविड१९ महामारीत योग्य ती काळजी घेत, आपल्या पंतप्रधानांना दीर्घायुष्य चिंतीत त्यांच्या सेवकार्याचा वारसा चालवत सर्व भाजपा कार्यकर्ते उत्साहात हा सेवा सप्ताह साजरा करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा