You are currently viewing कसाल, कडावल, हिर्लोक प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कसाल, कडावल, हिर्लोक प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

पावशी येथे ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन

पोखरण येथील कोविड स्थितीचा घेतला आढावा

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कसाल, कडावल, हिर्लोक प्रा.आ. केंद्रांना प्रत्येकी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. यावेळी आ. वैभव नाईक यांनी कोविड स्थितीची माहिती घेत औषध पुरवठा तसेच एकूण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासल्यास संपर्क करण्याचे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.तसेच ज्यांना लक्षणे आहेत त्यांची कोविड टेस्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी कसाल प्रा.आ. केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा देशपांडे, डॉ. शिवाली राणे, विनोद सावंत, अवधूत मालणकर, डॉ. बालम, सचिन कदम, बाळा कांदळकर, विकास राऊळ, प्रवीण भोगटे, गणेश मेस्त्री, *कडावल येथे* जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपसरपंच विद्या मुंज,आवळेगाव सरपंच सुनील सावंत, वर्दे सरपंच अपर्णा सुतार, तानाजी पालव, अनुराग सावंत, गुरुनाथ मुंज, मंगेश मर्गज, आनंद मर्गज, अमोल सावंत, डॉ. मनीषा चुबे, श्री. करमलकर, सी. आर सावंत, फार्मसिस्ट बांदेकर, आरोग्य सेविका व्ही.बी. सावंत, *हिर्लोक येथे* सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे, चंद्रकांत सावंत, बाजीराव झेंडे, डॉ. मनोज चंदनशिव, डॉ. विवेक देशमुख, फार्मासिस्ट प्रवीण गोवेकर, आरोग्य सहाय्यक पुरुषोत्तम तुळसुलकर, पी. जे सावंत उपस्थित होते.
पोखरण गावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पोखरण कुसबे ग्रामपंचायत येथे आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन कोविड स्थितीचा आढावा घेतला. कोविड टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तसेच रुग्णसंख्या कमी होण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना संबंधीतांना केल्या.
यावेळी सरपंच समीक्षा जाधव, विकास राऊळ, प्रवीण भोगटे, आरोग्य विभागाचे हरीश रणजित रावळ, सर्कल संतोष गुरखे, ग्रामसेवक वालावलकर, तलाठी जांभवडेकर, अरुण सावंत, राजू घाडी, विजय म्हाडेश्वर, दीपक भोसले, आदी उपस्थित होते.

पावशी ग्रामपंचायतच्या वतीने गावात ग्रामविलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या ग्रामविलगीकरण कक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. ग्रामविलगीकरण कक्षात आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शुद्ध व गरम पाण्यासाठी वॉटर हिटर,प्युरीफायर बसविण्यात आला आहे. तसेच जेवण नाष्टा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी कुडाळ तहसिलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे,ग्रामसेवक धामापूरकर, प्रसाद शेलटे, वैशाली पावसकर, चित्रा पावसकर, सीमा खोत, भाऊ पावसकर, पप्या तवटे, बंड्या खोत, शेखर पोकरे, सागर भोगटे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा