पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात सावंतवाडीत निदर्शने

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात सावंतवाडीत निदर्शने

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या माध्यमातून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. गांधी चौक येथील पेट्रोल पंप समोर मोदी सरकारचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार नेणाऱ्या मोदी सरकारचा निषेध तालुका कॉग्रेसचावतीन करण्यात आला. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू मसुरकर सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ, सच्चिदानंद बुगडे, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, आनंद परुळेकर, विभावरी सुकी, माया चिटणीस, विल्यम साल्डना, उमेश मोरिये, राकेश चितारी, जास्मिन लक्ष्मेश्वर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा