You are currently viewing वेत्ये येथील टीव्ही मेकॅनिक प्रसाद जोशी यांची आत्महत्या

वेत्ये येथील टीव्ही मेकॅनिक प्रसाद जोशी यांची आत्महत्या

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील सुप्रसिद्ध टीव्ही मेकॅनिक तथा हौशी नाट्य मंडळाचे पार्श्वसंगीतकार प्रसाद विष्णू जोशी (५५, रा. वेत्ये, रस्तावाडा ) यांचे सोमवारी सकाळी दुर्दैवी निधन झाले. घरासमोरील मठाच्या मागच्या बाजूला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

गेले काही दिवस आजारपणाने त्रस्त असल्याने ते मानसिक तणावाखाली होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती कळताच विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. एका चांगल्या कलाकाराला आपण मुकलो अशा शब्दात त्यांना नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे वेत्ये गावावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा