You are currently viewing दोडामार्ग येथे तिलारी कालव्यात आढळली बेवारस दुचाकी…

दोडामार्ग येथे तिलारी कालव्यात आढळली बेवारस दुचाकी…

दोडामार्ग

केळीचे टेंब येथे तिलारी गोव्याला जाणाऱ्या कालव्याच्या बाजूला एक बेवारस दुचाकी आढळून आली पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता ही दुचाकी कुणाची ही अद्याप समजले नसल्याचे पोलीस निरीक्षक आर.जी .नदाफ यांनी सांगितले.
आज रविवारी केळीचे टेंब येथे काही लोक गुरे चरण्यासाठी गेली असता त्यांना कालव्याच्या बाजूला दुचाकी पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत माहिती दोडामार्ग पोलिसात दिली पोलिस घटना स्थळी दाखल होत दुचाकी ताब्यात घेतली. मात्र ती दुचाकी कोणाची हे मात्र स्पष्ट झाले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा