You are currently viewing कुडाळात उद्या ७ जूनला सकाळी ११ वाजता कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन..

कुडाळात उद्या ७ जूनला सकाळी ११ वाजता कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन..

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले व जिल्हा काँग्रेसच्या सूचनेवरून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध..

कुडाळ :

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष मा.श्री.नानासाहेब पटाेले व जिल्हा कॉंग्रेसच्या सूचनेवरून केंद्रातील माेदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात कुडाळ तालुका कॉंग्रेसच्या वतीने साेमवार दिनांक ७ जून २०२१ राेजी सकाळी ठीक ११.०० वाजता कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या बाजूला पेट्रोल पंपावर आंदोलन करून केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात येणार आहे. हे आंदोलन शासनाने  काेराेना संदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून होणार आहे. तरी कुडाळ तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, सर्व फ्रंटल विभागाचे अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, कॉंग्रेस प्रेमी, हीत चिंतक यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन श्री. प्रकाश जैतापकर जिल्हा सरचिटणीस सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा