वैभववाडी.
५ जून ‘जागतिक पर्यावरण दिना’ च्या निमित्ताने ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’, निसर्ग मित्रपरिवार व ग्रामपंचायत तळेरे आणि परिक्षेत्र सामाजिक वनीकरण तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.देव गांगेश्वर मंदिर तळेरे येथील देवराईमध्ये बेल, रुद्राक्ष, कदंब, तामन, बहावा, गुलमोहर, पिंपळ, जांभूळ, काजू, सोनचाफा व रातांबा अशा ५५ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टचे सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील, निसर्ग मित्रपरिवाराचे अध्यक्ष श्री.संजय खानविलकर. माजी सभापती श्री.दिलीप तळेकर, सामाजिक वनीकरणचे श्री.तळेकर, श्री. संदेश तुळसणकर, श्रेयांक पाटील, ग्रामपंचायत सदस्य, व्ही.व्ही. दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक, ग्रामस्थ व निसर्गप्रेमी उपस्थित होते.