You are currently viewing लसिकरण माहिती वेळेत मिळत नसल्याने नागरिकांची दमछाक

लसिकरण माहिती वेळेत मिळत नसल्याने नागरिकांची दमछाक

लसिकरण नियोजन एक दिवस आधी कळवावे;सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांची मागणी

दोडमार्ग

सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ प्रदेशात असल्याने आणि दोन वाडी मधील अंतर अंदाजे दोन तीन किलोमीटर असल्याने आदल्या संध्याकाळी लसीकरणाचे नियोजन झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि सनियंत्रण समिती यांना नियोजन करण्यासाठी दमछाक होत आहे. त्यामुळे लसीकरणाचे नियोजन एक दिवस आधी त्या भागात कळवले तर शंभर टक्के नियोजन करण्यासाठी वेळ मिळेल आणि आरोग्य व सनियंत्रण समितीची दमछाक कमी होईल अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई आणि सचिव दादा साईल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा