अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देवगड मध्ये  महागाईच्या विरोधात निदर्शने

अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देवगड मध्ये  महागाईच्या विरोधात निदर्शने

देवगड

अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने आज देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस व महागाई यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने देवगड तालुका खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोल पंपावर मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शन करण्यात आले.
जनता पर गाज लुटोरों का राज, पेट्रोल 100 के पार , भाषा नविरोंकी सरकार, महागाई की तोटका मार, शर्म करो मोदी सरकार! अशा घोषणा देण्यात आल्या
सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार जास्त असल्यामुळे सोशल डिस्टन्सचा वापर करून आंदोलन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा