एक काळ होता,
दिवसभर शाळा.
पाठीवर दफ्तर,
अभ्यासाचा कंटाळा.
मुलांनी भरलेली मैदाने,
घामाने भिजलेली मुले.
हसत खेळत बागडायची,
जशी बागेत फुललेली फुले.
भावबंधकी घट्ट होती,
मदत एकमेका करायची.
सख्खे चुलत भेद नव्हते,
एकत्र कुटुंबात नांदायची.
गावपंचायत बसायची,
वाद सलोख्याने मिटायचे.
मंदिरातल्या आरतीला,
गावकरी एकत्र यायचे.
नव्हते दूरध्वनी,ना मोबाईल,
तरीही जवळची होती नाती.
थोरामोठ्यांना होता मान,
पाळल्या जायच्या रितिभाती.
खरंच एक काळ होता,
धुराने घर काळवंडायचे.
माणसांच्या मनात मात्र,
स्वच्छ आभाळ दिसायचे.
(दिपी)✒️
दीपक पटेकर. सावंतवाडी.