You are currently viewing घे उंच भरारी

घे उंच भरारी

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

*घे उंच भरारी*

घे उंच भरारी पाखरा
नकोस तू मागे फिरू
दशदिशा मोकळ्या
चिंता नकोस आता करू —-1

घे उंच भरारी गगनी
पसरूनी दोन्ही पंख
उजळतील दाही दिशा
नकोस ठेवू मनात डंख… …2

घे खुशाल उंच भरारी
मनात ठेवुनी लक्ष्य
सापडू नको कुविचारात
नकोस होऊ विकार भक्ष्य —3

होतील पूर्ण तव इच्छा
लाभेल जगती कीर्ती
पाहुनी तुझे कर्तृत्व
येईल अनेका स्फूर्ती —-4

घे उंच भरारी पाखरा
ओलांडुन संकट काटे
करशील साध्य उद्दिष्ट
ही आशा मनास वाटे……5

प्रतिभा पिटके
अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eighteen =