कुडाळ शहरात बुधवार ते बुधवार 8 दिवसांसाठी जनता कर्फ्यु……

कुडाळ शहरात बुधवार ते बुधवार 8 दिवसांसाठी जनता कर्फ्यु……

नागरिकांनी आवश्यकतेनुसार सर्व काळजी घेण्याचं व्यापारी संघटनेच आवाहन…

कुडाळ :

तालुक्यात व्यापारी संघाची मारुती मंदिर येथे बैठक संपन्न  झाली. कुडाळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ शहारातील व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे. यात संपुर्ण कुडाळ तालुका बंद ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच संपुर्ण जिल्हाही बंद ठेवण्याचाही विचार केला जात आहे. संपुर्ण  कुडाळ शहर हे 8 दिवसांसाठी पुर्णपणे बंद ठेवले जाणार आहे.

कुडाळ शहरातील  सर्व दुकाने सरसकट बंद राहतील. फक्त दुध दुकाने सकाळी 9:30 पर्यंत राहतील. त्या दुकानामध्ये इतर कोणतीही वस्तु ठेवली जाणार नाही. वर्तमानपत्रे सकाळी 10 वाजेपर्यंत चालु राहतील. वैद्यकीय सेवा मात्र चालु राहतील. व्यापारी संघटनेच्या वतीने कोरोनामुळे मृत्यु झालेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कुडाळा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे यांनी  आवाहन केले आहे कुडाळ  शहरातील सर्व नागरिकांनी आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी अस आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा