जुगार दारू व्यवसायच नव्हे, अंमली पदार्थांचा सुद्धा करतो पुरवठा.
महिलेशी फोनवरून गैरवर्तन करून तिच्या घरात शिरलेल्या दात पडक्या आप्पाला महिलेने आपल्या पतीच्या मदतीने घरातील खोलीत जेरबंद करत जसा वाघाला पिंजऱ्यात पकडून त्याचा उंदीर करतात तशीच गत केली होती. परंतु मध्यस्तीच्या मदतीने आपली सुटका करून घेत दात पडक्या आप्पा बाहेर आल्यावर त्या महिलेच्या पतीवर, तिच्यावर पैशांच्या आणि आपली राजकीय नेत्यांशी असलेल्या ओळखीच्या जोरावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.
फोंडयाच्या दात पडक्या आप्पाची राजकीय नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी जवळीक आहे. गैरधंदे करणारी व्यक्ती राजकीय आश्रय घेऊन असतेच तसाच दात पडक्या आप्पा देखील राजकीय आश्रित आहे. राजकारण्यांना अडचणीत मदत करणारा आप्पा आपल्यावर संकट आल्यावर त्याच राजकीय लोकांना पुढे आणून संकटमुक्त होण्याच्या प्रयत्नात आहे. दात पडक्या आप्पाचे अनेक अनैतिक धंदे असून त्याला राजकीय पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. महिलेशी गैरवर्तनाच्या प्रकरणात महिलेने महिला दक्षता समितीकडे तक्रार दिल्याने आप्पाला वाचविण्यासाठी राजकीय दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे दोन लाख घ्या आणि गप्प बसा असे सांगत महिलेची मुस्कटदाबी करण्याचा आप्पा प्रयत्न करत आहे. पतीच्या ओळखीने दात पडक्या आप्पा राजकीय लोकांना घेऊन घरी यायचा. मटणाच्या पार्ट्या असायच्या. त्यावेळी दात पडक्या आप्पाची आपल्याकडे वाईट नजर असायची अशी धक्कादायक माहिती पीडित महिलेने दिली आहे.
दात पडक्या आप्पा हा जिल्ह्यात जुगाराचा बादशाह म्हणून परिचित असला तरी गोव्याची दारू सांगली, सातारा इत्यादी ठिकाणी पुरविण्याचा देखील त्याचा मोठा गैरधंदा आहे. परंतु यापेक्षाही मोठी बातमी म्हणजे दात पडक्या आप्पा जुगार, अवैध दारू याचबरोबर सांगली कोल्हापूर येथे अंमली पदार्थांचा देखील पुरवठा करतो अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनैतिक व्यवसायातून मिळणाऱ्या बक्कळ पैशांच्याच जोरावर दात पडक्या आप्पा गोरगरीब महिलांचे शोषण करतो. समाजात वाढत चाललेल्या अशा वाईट प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.