You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णसेवेत दाखल

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णसेवेत दाखल

मालवण :

मालवण ग्रामीण रुग्णालय येथील पालिकेच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या २० ऑक्सिजन बेडच्या कोविड डीसीएचसी सेंटर मध्ये शुक्रवारी आणखी १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून रुग्णसेवेत दाखल झाले.

एकूणच आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे व अन्य सर्वांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या २० ऑक्सिजन बेड डीसीएचसी कोविड सेंटर मध्ये ५० जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अन्य आरोग्य यंत्रसामग्री, औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. आता नव्याने १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णसेवेत दाखल झाले. अशी माहिती बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली.हे  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ग्रामीण रुग्णालय विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, आरोग्य सभापती दर्शना कासवकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, संमेश परब, उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा