You are currently viewing पुढील 3 दिवसात धडकणार मान्सून

पुढील 3 दिवसात धडकणार मान्सून

अखेर काल केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे काल सकाळपासूनच केरळातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर पुढील दोन तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून  वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, लक्षद्विप आणि केरळातील उर्वरित भागासह  दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळाडूच्या या भागांना व्यापलं आहे. बंगालच्या उपसागरातही मान्सून दाखल झाला आहे. दक्षिणेतील वाऱ्याच्या चक्रीय गतीमुळे मागील आठवड्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वेग श्रीलंकेच्या परिसरात मंदावला होता. पण त्यानंतर आता मोसमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भागासह गोवा आणि महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =