व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण देशात आणि जगभरात मार्केटिंग करण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती असणारी अद्ययावत वेबसाईट भारतातील सर्व आणि जगभरातील इतर अशा एकूण पन्नास भाषेमध्ये केली जात असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली. अशा प्रकारचे वेबसाईट तयार करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्व भाषेत वेबसाईट असावी ही संकल्पना महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांची असून त्याला महासंघाचे सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोळकर यांनी मूर्त स्वरूप दिले आहे.
वेबसाईट वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पर्यटन स्थळे गावा गावातील मंदिरे चर्च बीचेस गड-किल्ले कृषी पर्यटन लोककला मालवणी पदार्थ संस्कृती जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास जिल्ह्याची निर्मिती त्याच बरोबर आध्यात्मिक साहस ऍग्रो बीच टुरिझम याबरोबरच सिंधुदुर्ग चा नकाशा आणि इतर सर्व पायाभूत सुविधांची माहिती मिळणार आहे. महासंघाने आतापर्यंत राज्यातील आणि राज्याबाहेरील दहा ते बारा टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सी संपर्क साधला आहे.