You are currently viewing सिंधुनगरी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी साजरी

सिंधुनगरी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी साजरी

सिंधुदुर्गनगरी

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सिंधुनगरी येथील पत्रकार भावनातील स्मारका ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर व जिल्ह्यातील पत्रकार, पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी रणजीत पवार, सचिव देवयानी वरसकर, परिषदेचे प्रतिनिधी माजी अध्यक्ष गणेश जेठे, परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, उपाध्यक्ष बाळ खडपकर, रमेश जोगळे, संतोष राऊळ, मुख्यालय पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप गावडे, कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, संजय वालावलकर, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद परब, सतीश हरमलकर आधी पत्रकार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 10 =