You are currently viewing “आकार लघुपट” उतरतोय प्रेक्षकांच्या पसंतीस..

“आकार लघुपट” उतरतोय प्रेक्षकांच्या पसंतीस..

सिंधुदुर्ग:

 

गणेश चतुर्थीमध्ये प्रदर्शित झालेला “आकार” हा लघुपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय! गेल्या महिन्यात २२ सप्टेंबर २०२३ ला “माझा कोकण07” या युट्युब चॅनलवर “आकार” हि शाॅर्टफिल्म प्रदर्शित झाली. दिपक नारायण गुराम आणि माझा कोकण या लघुपटाचे निर्मिती प्रमुख आहेत. तसेच या कथेच लेखन, दिग्दर्शन अक्षय श्रीकांत कासले यांनी केलं. या लघुपटाची कथा हि काल्पनिक असून गणपती बाप्पाच्या मुर्तीच्या “आकारा”वर आधारीत आहे. सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला संदेश देणारा हा लघुपट सर्वांनी नक्की पहावा असे आवाहन माझा कोकण टिम तर्फे करण्यात येत आहे. या लघुपटाचे संपादन, संकलन कॅमेरामन निलेश भोई यांनी केले. कलादिग्दर्शन आणि लाईन प्रोड्यूसर म्हणून अंकुश कुंभार सर यांनी कार्यभार सांभाळला. सचिन गुंड, अमोल गोसावी यांच्यासह साईश गुंड, सौ. मेघा (मिलन) कुंभार, विजय शिरसाट, जयराम वारंग, पियुष आडेकर,महेश कुंभार, चंदन कुंभार आदी सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने या लघुपटामध्ये रंगत आणली. रंगभूषा वेशभूषा सागर जाधव आणि सचीन परब यांनी केली. सध्या दशावतार क्षेत्रात उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आशिष तवटे यांनी या लघुपटासाठी संगीत दिले आहे. तबला- पखवाजवादक साईश उमळकर, हर्षल म्हापणकर यांची त्यांना उत्तम साथ लाभली. सध्या गाजत असलेलं “धाव मोरया” हे गाणं बा विठ्ठला या पंडित सुरेशजी वाडकर यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याच्या चालीवर आधारीत आहे. दशावताराच्या माध्यमातून “धाव मोरया” या स्तवन गीताची रचना करून बुवा आशिष तवटे यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. लघुपटाच्या माध्यमातून हे गीत घराघरात पोहचलं आणि प्रेक्षकांची याला पसंती सुद्धा मिळतेय. या गाण्याचं ध्वनी मुद्रण हे कुडाळ मधील अजित चव्हाण यांच्या स्टुडियो मध्ये झालं. लघुपटाचं पोस्टर डिझाईन ओमकार धुरी यांनी केलं. जगन्नाथ संगित विद्यालय कुडाळ, पखवाज अलंकार श्री महेश सावंत, ओम साई कला केंद्र कुंभारवाडी कुडाळ, चंद्रकांत कुंभार, चंदन कुंभार, जयेंद्र कुंभार, सुनील कुंभार, अनिल कुंभार आणि उद्धव बोरसुतकर यांच या लघुपट चित्रीकरणादरम्यान विशेष सहकार्य लाभले. सामाजिक संदेश देणारा हा लघुपट शाॅर्टफिल्म फेस्टीव्हल मध्ये नेण्याचा मानस आहे. हा लघुपट युट्युब चॅनेलच्या माध्यमातून पहावा असे आवाहन संपुर्ण टिम कडून करण्यात येत आहे.

(यासोबतच चित्रीकरणादरम्यानची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ लिंक दिली आहे.)

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा