बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन चित्रकला स्पर्धेतून तंबाखूविरोधी जनजागृती

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन चित्रकला स्पर्धेतून तंबाखूविरोधी जनजागृती

बांदा

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून बांदा नं. १केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी तंबाखू विरोधी ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन जनजागृती केली.
दरवर्षी ३१मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची चित्र व घोषवाक्य याच्या माध्यमातून जनजागृतीची केली.
या दिवशी विद्यार्थ्यांनी धुम्रपानाचे दुष्परिणाम दाखवणारी काढलेली चित्रे हातात धरून सोशल मीडियावर शेअर केली. धुम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन ठिकठिकाणी थुंकल्याने कोरोनाचा प्रसार होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनाविरोधी जनजागृती केली व नागरिकांनी तंबाखूचे सेवन करू नये असे आवाहन यादिवशी केले.
या दिवशी शाळा पातळीवर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला तो पुढीलप्रमाणे
*लहान गट*:-प्रथम-चिन्मयी रुबजी, द्वितीय – वेद परब, तृतीय- निल बांदेकर, चतुर्थ -दत्तराज काणेकर ,पाचवा- ओम कोकाटे
*मोठा गट*:-प्रथम -सानवी महाजन, द्वितीय- नेहा शंभरकर, तृतीय (विभागून) -वेदांत संदीप सावंत व दुर्वा तानेश्वर गवस ,
चतुर्थ- चैतन्या तळवणेकर व भिकाजी देसाई,पाचवा-शुभंकर वराडकर व ऋतुजा बांदेकर
शिक्षक श्री जे. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या उपक्रमात मुख्याध्यापक सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या वतीने आॉनलाईन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा