सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची उपस्थिती; आमदार वैभव नाईकांची माहिती…
कणकवली
घोटगे-सोनवडे घाटमार्गाला चालना देण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या १ जून रोजी सकाळी ११.३० वाजता बैठक होणार आहे. यात श्री.चव्हाण हे व्हिडिओ कॉन्स्फरन्सच्या माध्यमातून बांधकामचे सचिव, प्रमुख अधिकारी यांच्यासमवेत घाटमार्ग कामाचा आढावा घेणार आहेत. तसेच या बैठकीला खासदार विनायक राऊत, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर आणि आपण स्वत: देखील सहभागी होणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.