You are currently viewing मोहन तळगांवकर व मंगेश तळगांवकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली कोविड सेंटरला दिले १०० जिदोकस किट

मोहन तळगांवकर व मंगेश तळगांवकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली कोविड सेंटरला दिले १०० जिदोकस किट

कणकवली

कणकवली तालुका दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष सुवर्णकार श्री. मोहन तळगावकर आणि करंजे सरपंच तथा सुवर्णकार श्री. मंगेश तळगावकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत कणकवली नगरपंचायत कोविड सेंटरला रुग्णांसाठी अत्यावश्यक जिदोकस किट च्या 100 गोळ्यांचं किट नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द केलं.

कोरोना रुग्णांसाठी असणाऱ्या 14 दिवसांच्या ट्रीटमेंट मध्ये जिदोकस गोळ्या प्रभावी ठरतात. नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय ट्रीटमेंट आणि अन्य सेवा दिल्या जात आहेत. त्याला हातभार लावावा म्हणून तळगावकर बंधूनी आपल्या वाढदिवसानिमित्त या गोळ्यांचे 100 किट दिले. सुमारे 20 हजार रुपये किमतीच्या गोळ्यांचा फायदा कोव्हीड केअर सेन्टरमधील 100 रुग्णांना होणार आहे. यावेळी गटनेता संजय कामतेकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =