अष्टाक्षरी लेखन
हृदयाच्या जवळचा,
एक असतो सोबती.
शब्दांच्या आसपासच,
असे कोण अशी व्यक्ती.
सुख दुःख ज्यांच्याकडे,
हक्काने सांगता येती.
सुखात हास्य फुलवी,
दुःखात मिठीत घेती.
नातं नसेल रक्ताचं,
जुळलं आपुलकीने.
नसतो कसला स्वार्थ,
जिंकतो मन प्रेमाने.
संकट येता एकास,
दुसरा धावून जातो.
खांद्यावरचा हात तो,
प्रेमाचीच साक्ष देतो.
न बोलताही चेहरा,
तो स्वतःच ओळखतो.
चेहऱ्या मागील दुःख,
न सांगताच जाणतो.
ओळख अशा नात्याची,
काय म्हणूनी सांगावी.
मैत्र हेच नाव त्याचे,
महती काय मांडावी.
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६