You are currently viewing डाक विभागाची पेन्शन अदालत….

डाक विभागाची पेन्शन अदालत….

सिंधुदुर्गनगरी

डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन,पेन्शन संबंधी तक्रारींचे प्रामाणिकपणे निवारण करण्यासाठी डाक विभागातर्फे पेंशन अदालत चे आयोजित केले आहे. पोस्ट मास्तर जनरल, क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा येथे बुधावार दिनांक 21 जून 2021 रोजी  11 .00 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आलेली आहे.

         पेन्शन संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 3 महिन्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तक्रारींची या डाक पेन्शन अदालत मध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे उदा. उत्तरधिकार तसेच धोरत्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंशन अदालत मध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलांसह केलेला असावा. तारिख व ज्या अधिकाऱ्यांस मूळ तक्रार पाठविली असेल त्यांचे नाव, हुद्दा इत्यादी संबंधित पेंशन बाबतची आपली तक्रार  शिव कुमार वर्मा,वरिष्ठ लेखाधिकारी क्षेत्रिय कार्यालय पणजी गोवा यांचे कार्यालय यांचे नावे अतिरिक्त प्रतिसह दिनांक 1 जून 2021 तत्पूर्वी  पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. दिनांक 1 जून 2021 च्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही .

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =