ही वेळ आदोलन करण्याची नाही म्हणून सुरक्षा रक्षक मुग गिळून गप्प आहेत.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती अध्यक्ष विजय गुरव.
सिंधुदूर्ग :
सिंधुदूर्ग आरोग्य विभागात ५२ सुरक्षा रक्षक कार्यरत असून गेले सात महीने पगार थक्कीत आहेत. हे सुरक्षा रक्षक इमानेइतबारे कोविड काळात काम करतात. आता तर त्याती काही सुरक्षा रक्षक कोरोणा पॅाझेटीव्ह येवू लागले आहेत.
मंत्री राजेशजी टोपे यांच्या कार्यालयाजवळ समितीने पाठपुरावा करुण ग्रामीण रुग्णालयांना तिन महिन्याचा व जिल्हा रुग्णालयाला एक महिन्याचा निधी उपलब्ध केलेला असून तबल आठ दिवस उलटूनही जिल्हा रुग्णालयाने अजून एक महिन्याचा पगार काढलेला नाही. यावरून असे स्पष्ट होते आहे कि जिल्हा रूग्णालयातील पगाराच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मनाची आणि जनाची पण लाज सोडली आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी झोपेच सोग बाजूला ठेवून सुरक्षा रक्षकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुण संबंधीत अधिकाऱ्यांना जाब विचारावा. संबंधीत अधिकाऱ्यांची तक्रार ही आरोग्य मंत्री टोपे साहेब यांच्या जवळ करण्यात येणार आहे.