कुडासे खुर्द पाल पुनर्वसन गावात सुद्धा राबविला उपक्रम; सरपंच संगीता देसाई यांच्या हस्ते झाली सुरुवात
दोडामार्ग
“माझा गाव माझी जबाबदारी” या ऊक्तीप्रमाणे कोरोनाच्या संकटकाळात गावातील लोकांच्या सुरक्षितेसाठी प्राणजीवन सहयोग संस्थचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक संदीप चौकेकर यानी कोव्हीड १९ चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या संस्थेतर्फे सँनिटायझर फवारणी करण्याचा घेतलेला हा निर्णय निश्चितच जिल्ह्यात आदर्शवत ठरत आहे.
सध्या याच संस्थेकडून कुडासे खुर्द पाल पुनवर्सन गावात सरपंच संगिता सुहास देसाई यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली, ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार खोक्रल सरपंच तथा संस्थेचे मार्गदर्शक देवेंद्र शेटकर यांच्या सहकार्याने विनाशुल्क सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. यामुळे गावातील नागरिकांकडून या संस्थेचे कौतुक केले जात आहे.
गावातील कंटेंटमेन्ट झोन, सार्वजनिक ठिकाणी व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी संस्थेकडून सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. दोडामार्ग तालुक्यातील खोक्रल उसप पिकुळे खानयाळे साटेली भेडशी बोडण शिरंगे आदी गावात फवारणी मोफत करण्यात आली आज कुडासे खुर्द पाल पुनवर्सन गावठाणात सर्व ठिकाणी सॅनिटायझर फवारणी केली.
यावेळी ग्रामपंचयात सदस्य संदेश देसाई सदस्या सौ सानवी संदीप दळवी पोलीस पाटील दाजी देसाई आशा सेविका ऋणाली देसाई तानाजी देसाई संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या संस्थेच्या वतीने तालुका प्रतिनिधी समीर घाडी, मार्गदर्शक श्री देवेंद्र शेटकर, स्वयंसेवक ऋषिकेश गवस विवेक दळवी अजय गवस,सुमित गवस राहुल गवस जिल्हा उपक्रम प्रमुख प्रसाद मेहता सहप्रमुख प्रशांत गावडे आदीचे सहकार्य लाभले तसेच गावातील सरपंच सोबत युवक मंडळ कार्यकते इत्यादी उपस्थित होते.