You are currently viewing चक्कर येऊन मृत्यू पावलेला “तो” भाजी विक्रेता निघाला कोरोना पॉझिटीव्ह

चक्कर येऊन मृत्यू पावलेला “तो” भाजी विक्रेता निघाला कोरोना पॉझिटीव्ह

देवगड
चक्कर येवून पडून मयत झालेल्या पाटथर येथील भाजीविक्रेत्याचा मृत्युनंतर कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, तो भाजी विक्रेता दररोज सकाळी देवगडमध्ये भाजी घेवून विक्रीसाठी येत असे. कोकम, भाजी, आंबे, फणस ते विक्रीसाठी पाटथर येथून घेवून येत व देवगड एस्टी स्टँडसमोर विक्री करण्यासाठी बसत होते.

मंगळवारी सकाळी १०.३० वा.सुमारास चक्कर येवून ते एस्टी स्थानक परिसरात पडले व तेथेच त्यांचा मृत्यु झाला.
देवगड पोलिस स्टेशनला कळविताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली यावेळी ते मयत झाल्याचे निदर्शनास आले. त्यांना ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले व तेथे कोरोना तपासणी करण्यात आली यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कळवून मृतदेह ताब्यात देण्यात आला.

देवगड एस्टी स्टँडसमोर दररोज भाजीविक्रीसाठी येणाऱ्या विक्रेत्याचा चक्कर येवून पडून मृत्यु झाल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा