You are currently viewing सरपंच संघटनेच्या लसिकरण मागणीला यश – प्रेमानंद देसाई सरपंच संघटना सिंधुदुर्ग.

सरपंच संघटनेच्या लसिकरण मागणीला यश – प्रेमानंद देसाई सरपंच संघटना सिंधुदुर्ग.

पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती मागणी

जिल्हाधिकारी यांचे आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांना आदेश

ग्रामस्तरिय संनियंत्रण समिती साठी २०००डोस राखीव
एप्रिल महिन्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व विशेष करुन ग्रामीण भागात कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली होती तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेने मा ना.पालकमंत्री व मा जिल्हाधिकारी यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत ग्रामस्तरीय संनियंत्रण समिती पुन्हा पुनरूज्जीवीत करून काम करावे अशी विनंती केली होती तेव्हा ग्राम स्तरावर असलेल्या सोयीसुविधा यांचा विचार करता सरपंच व संपुर्ण ग्राम संनियंत्रण समिती ला काम करताना सरपंच कोविड पाॅझिटीव्ह होऊ शकतात तेव्हा तात्काळ संनियंत्रण समितीला लसिकरण करावे अशी मागणी केली होती तिला मा.ना.श्री.उदयजी सामंत, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी तत्वतः मान्यता दिली होती आणि आज त्याचा आदेश जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिफे यांनी सर्व पंचायत समिती स्तरावर दिलेला आहे. यासाठी २०००डोसचे राखीव डोस ठेवून संनियंत्रण समितीला लसिकरण करावे असा आदेश आहे.त्यासाठी ग्रामस्तरिय संनियंत्रण समिती च्या पात्र सदस्यांच्या नावाची यादी, मोबाईल नंबर व पत्तासहित यादी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना द्यावी अशी सुचना आहे.या लसिकरणाचा तात्काळ लाभ संनियंत्रण समिती ने घ्यावा असे आवाहन सरपंच संघटनेचे श्री प्रेमानंद देसाई यांनी केले आहे.मा.पालकमंत्री व मा जिल्हाधिकारी यांचे संघटनेचे वतीने जाहीर आभार व्यक्त करित आहोत ही लसिकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सचिव दादा साईल, सुरेश गावडे,अनुप नाईक, प्रमोद गावडे,नागेश परब, संजय आईर, विश्राम सावंत यांनी बैठकीत भाग घेऊन मागणी यशस्वी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 3 =