You are currently viewing सहकार खात्यातून निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट यांनी अर्ज करावेत

सहकार खात्यातून निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट यांनी अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वेये चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज सहकार खात्यातून निवृत्त न्यायाधीश, वकील (सनद प्राप्त), चार्टर्ड अकाऊंटंट यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

              तसेच विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व अधिनस्त सर्व तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सह.संस्था या कार्यालयात दिनांक 19 मे 2021 ते 18 जून 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील.

            अर्जासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडण्यात यावीत.आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक अर्हतेसंबंधी कागदपत्रे (पदवी प्रमाणत्र) वकील असल्यास बार कौन्सिल सर्टिफिकेट जोडावे, अनुभवासंदर्भात आवश्यक कागदपत्रे इ.  याबाबतची जाहीर सुचना उपरोक्त नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.अशी माहिती माणिक भा. सांगळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा