You are currently viewing मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे कोविड रुग्णांसाठी सकस आहार व ग्रामीण रुग्णालय कट्टा-पेंडुर येथे थर्मलगन, ऑक्सिमीटर, वाफेचे मशिन वाटप

मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे कोविड रुग्णांसाठी सकस आहार व ग्रामीण रुग्णालय कट्टा-पेंडुर येथे थर्मलगन, ऑक्सिमीटर, वाफेचे मशिन वाटप

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावतीने पंधरा दिवस उकडलेली अंडी व केळी यांचे मालवणात होणार वाटप

मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज मालवणात शासकीय तंत्रनिकेतन येथे कोविड रुग्णांसाठी मनसे नेते परशुराम उपरकर यांच्यावतीने सकस आहार वाटप उपक्रमाची सुरुवात मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव तालुका सचिव विल्सन गिरकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शैलेश अंधारी, निखिल गावडे, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, लावण्य गावडे आदी उपस्थित होते.

सकस आहार शासकीय तंत्रनिकेतन येथे परिचारिका यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कोरोना विषाणू आपत्ती व्यवस्थापनात कोविड रुग्णांनी सकस आहार घेऊन इम्युनिटी वाढवणे हेच प्रमुख आरोग्य धोरण असल्याने मालवण तालुका मनसेने पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या सूचनेनुसार पुढील १५ दिवस कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त सकस आहार पुरवण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दि.२४ मे पासून मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उकडलेली अंडी तसेच केळी हा आहार रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तर कट्टा-पेंडुर येथे ग्रामीण रुग्णालयात परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सुमंत तारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्यावतीने १ थर्मल गन व १ ऑक्सिमीटर तसेच महाराष्ट्र सैनिक दिपक गुराम यांच्यावतीने स्टीमर(वाफेचे मशीन) यांचे वाटप करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. स्वप्निल बोदमवाड, अनघा तळा्वडेकर, रमांकात आंगणे हे कर्मचारी उपस्थित होते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुकाध्यक्ष विनोद साडंव, महाराष्ट्र सैनिक दिपक गुराम, गणेश वाईरकर,दोडामार्ग संपर्क अध्यक्ष अमोल देसाई, लालबाग गड शाखाअध्यक्ष निलेश इंदप,देवगड सहसंपर्क अध्यक्ष संतोष मयेकर, महाराष्ट्र सैनिक गणेश भोजणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा