You are currently viewing वेंगुर्ले येथे ४ मार्चला जिल्हास्तरीय “दैवज्ञ चषक २०२३” क्रिकेट स्पर्धा…

वेंगुर्ले येथे ४ मार्चला जिल्हास्तरीय “दैवज्ञ चषक २०२३” क्रिकेट स्पर्धा…

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग सुवर्णकार समाजातील युवक संघटितपणे एकत्र येण्यासाठी वेंगुर्ले कँम्प येथील क्रीडांगणावर ४ मार्चला “दैवज्ञ चषक २०२३” चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यास रोख रुपये ११,००० व उपविजेत्यास रोख रुपये ७,००० आणि चषक तसेच मालिकावीर, सामनावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दैवज्ञ समाजातील युवकांना संघटित करण्याचा हा प्रयत्न आहे. या स्पर्धेत दैवज्ञ समाजातील युवकांनी आपल्या संघासह भाग घ्यावा. तसेच स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी दैवज्ञ समाज बांधवाबरोबरच क्रिकेट रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्लेचे अध्यक्ष भाऊ मालवणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा