सभापती रावराणे, उपसभापती पारकर यांनी दिले निमंत्रण
कणकवली
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती कणकवलीच्या नुतन इमारतीचे बांधकाम हल्लीच पूर्णत्वास आले. या बांधकामासाठी २०१५-१६ साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली होती. त्यामुळे या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आपल्याच शुभहस्ते व्हावे, अशी इच्छा कणकवली कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या निमंत्रणास देवेंद्र फडणवीस यांनी मान दिला असल्याने पं. स. च्या नुतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते होणार आहे.
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून पं. स. च्या नवीन इमारतीच्या कामास सुरुवात झाली होती. सदर इमारतीचे भूमीपुजन खा. नारायण राणे यांच्या हस्ते झाले करण्यात आले होते. ती इमारत आता पुर्णत्वास आली असून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. सद्यस्थितीचा विचार करता कोरोनाविषयीचे नियम, अटी व शर्थी यामध्ये शिथिलता आल्यानंतर लगेचच पं. स. कणकवलीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या उद्घाटनासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आली होती. ती विनंती देवेंद्र फडणवीस यांनी स्विकार केल्यामुळे आता पं. स. कणकवलीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पं. स. कणकवलीचे सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर आदी उपस्थित होते.