खारेपाटण :
महाराष्ट्र् राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज सायंकाळी ६.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण येथे जिल्हा भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे देखील भाजप पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार निलेश राणे, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड हे उपस्थित होते.
जिल्ह्याच्या वतीने भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे, कणकवली सभापती मनोज रावराणे, माजी सभापती दिलीप तळेकर, भाजप तालुका सरचिटणीस महेश गुरव, खारेपाटण भाजप शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, पं. स. सदस्य तृप्ती माळवदे, भाजप महिला आघाडीप्रमुख उज्ज्वला चिके, सरचिटणीस रवींद्र शेट्ये, जिल्हा चिटणीस सोनू सावंत, प्रशांत गाठे, राजा जाधव, वरुनकर, भाऊ राणे, सागर कांबळे, नडगिवे उपसरपंच अरुण कर्ले आदी भाजप पक्षाचे जिल्ह्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
चक्रीवादामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येथील शेतकरी बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून तसेच काही ठिकाणी घरावर झाडे कोसळली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. तसेच वादळामुळे झालेल्या घरांची पडझड गोठ्याचे नुकसान, आंबा काजू बागायतीचे नुकसान याची पाहणी करणार आहेत.