You are currently viewing सावंतवाडी माठेवाडा अंगणवाडीच्या वतीने आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ

सावंतवाडी माठेवाडा अंगणवाडीच्या वतीने आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडीच्या वतीने ‘एक तरी झाड लावा’ या संकल्पनेतून तुळशी वृंदावनाचे रोप देऊन आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी ग्लोबल वार्मिंगच्या या युगात महिलांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून दिले.

आरोग्य व क्रीडा माजी सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. श्रेया आडीवडेकर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीपदी म्हणून उपस्थित होत्या. माठेवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ अंतर्गत अंगणवाडी क्रमांक १५ च्या अंगणवाडी सेविका सौ. अनुराधा पवार यांच्या हस्ते वाण म्हणून हे तुळशीचे रोप देऊन हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला.

प्रत्येकाच्या दारासमोर असलेले तुळशी वृंदावन म्हणजे स्त्रीची सखी असते. त्यामुळे हेच तुळशीचे रोप वाण देऊन हा हळदी कुंकू साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सौ श्रेया आडीवडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तुळशीचे रोप प्राणवायूची निर्मिती करते त्यामुळे घराचा परिसर हा आरोग्य व पर्यावरणदृष्ट्या उत्तम राहतो. तुळस ही आयुर्वेदिक आहे तिचे अनेक उपयोग आहेत. त्यामुळे हळदीकुंकवाचे हे वाण प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासमोर लावावे. तसेच त्याची अनेक रोपे घराच्या सभोवताली लावावे हा या मागचा उद्देश असल्याचे यावेळी अनुराधा पवार म्हणाल्या.

यावेळी अंगणवाडीच्या पालक सौ रुचिका कदम यांनी मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या हळदीकुंकू समारंभास अंगणवाडीच्या मदतनीस अमिषा सासोलकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका चैत्राली गवस, शिक्षिका भक्ती फाले, प्राची ढवळ, पूजा ठाकूर, सपना विरनोडकर, समीखा भिसे, सौ तोरस्कर, नेहा प्रभू, रुची नाईक,  भावना किटलेकर तसेच छोट्या बालकांमध्ये वैष्णवी चव्हाण स्निग्रा प्रभू सुकम करमळकर जानवी मेस्त्री तनया शिरसाठ वेदांश कदम दक्ष राऊळ रिद्धिमा किटलेकर अल्फा शेख गुरुराज केसरकर रोहित मुंज चिराग विरनोडकर आदी सह छोटी मुले यावेळी उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा