You are currently viewing मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या दि. 21 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            शुक्रवार दि. 21 मे 2021 रोजी सकाळी 9.10 वा. हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 9.40 वा. चिपी विमानतळ येथे आगमन, सकाळी 9.45 वा. मोटारीने वायरी, ता. मालवणकडे प्रयाण, सकाळी 10.10 वा. वायरी, ता. मालवण येथे आगमन व तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, सकाळी 10.20 वा. मोटारीने मालवणकडे प्रयाण, सकाळी 10.25 वा. मालवण येथे आगमन व तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, सकाळी 10.35 वा. मोटारीने निवती, ता. वेंगुर्लाकडे प्रयाण, सकाळी 11.05 वा. निवती येथे आगमन व तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, सकाळी 11.15 वा. मोटारीने चिपी विमानतळ बैठक सभागृहाकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा. चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे आगमन व तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक, दुपारी 12.00 वा. चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + four =