सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्याकरिता कोवॅक्सीन लसीचे 1 हजार 770 डोस प्राप्त झाले आहेत. ही कोवॅक्सीन लस ही ज्या नागरिकांना कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेला आले त्यांना प्राधान्याने दुसरा दोड देण्याकरिता राखीव आहे. या लसीकरण सत्रामध्ये 45 वर्षावरील नागरीकांना दुसरा डोस दिला जणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स यापैकी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनाही यावेळी दुसरा डोस दिला जाणार आहे. तरी ज्या नागरिकांना कोवॅक्सीनचा दुसरा डोस देय आहे त्यांनी उद्या दि. 21 मे 2021 रोजी लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.
सदर लस ही लसीकरण केंद्रावर पुढील प्रमाणे उपलब्ध असणार आहे. कणकवली तालुक्यात कासार्डे येथे 80, देवगड तालुक्यात जामसंडे येथे 200, मालवण तालुक्यात चौके येथे 300, कुडाळ तालुक्यात माणगाव येथे 200, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथे 200, पोलीस डिस्पेंन्सरी येथे 130, वेंगुर्ला तालुक्यात आडेली येथे 300, सावंतवाडी तालुक्यात बांदा येथे 200, दोडामार्ग तालुक्यात भेडशी येथे 160 या प्रमाणे एकूण 1770 असणार आहेत. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.