You are currently viewing आज पुन्हा आ.वैभव नाईक कुडाळ वीज वितरण कार्यालयात

आज पुन्हा आ.वैभव नाईक कुडाळ वीज वितरण कार्यालयात

कुडाळ शहरात बंद असलेला वीज पूरवठा सुरळीत करण्याच्या केल्या सूचना

कुडाळ शहरात विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे विजेअभावी शहराला होणारा पाणीपुरवठा बंद आहे. याची दखल आमदार वैभव नाईक यांनी घेऊन आज पुन्हा कुडाळ वीज वितरण कार्यालयात भेट देऊन तात्काळ त्रुटी दूर करून वीज पुरवठा सुरु करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता श्री. लोकरे यांना दिल्या. तसेच कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील बंद असलेली वीज कनेक्शने ज्यादा टीम वापरून लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
कुडाळातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडे दाखल झालेल्या टीमची तसेच कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची माहिती आ.वैभव नाईक यांनी घेतली. तसेच सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी विद्युत पोल, वाहिन्या तुटून नुकसान झाले आहे.त्यामुळे लोक अंधारात असून नागरिकांची गैरसोय होत आहे.त्यामुळे युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, हुमरस सरपंच अनुप नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा