You are currently viewing तातडीने कुडाळ तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी…

तातडीने कुडाळ तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी…

कुडाळ माजी नगराध्यक्ष तथा भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे

 

कुडाळ:-

कुडाळ तालुक्यातील सामान्य नागरिक अगोदरच कोविड 19 मुळे मेटाकुटीस आलेला असताना नुकतेच  तौक्ते चक्रीवादळाने संपूर्ण कुडाळ तालुक्यात थैमान घालून अनेक जणांच्या घरांचे,गोट्यांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन सामान्य नागरिकांच्या घरांचे मोठे  नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांच्या छपरावर झाडे पडून छपराची कौले फुटून नुकसान झाले. कोविड 19 मुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असतानाच तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या घराच्या नुकसानीचा फटका नागरिकांना बसला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी नुसती पाहणी करून लोकांना भावनिक करण्यापेक्षा स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी. कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी विज पुरवणी खंडित झाल्यामुळे सामान्य नागरिकांचे गावोगावी पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. कुडाळात अनेक प्रकल्प विद्युत पुरवठा यावर ते अवलंबून असताना बंद असलेल्या वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश जारी करावेत तसेच कुडाळ तालुक्यात तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी असे निवेदन कुडाळ माजी नगराध्यक्ष तथा भाजपा कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे यांनी कुडाळ तहसीलदार यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + fifteen =