सिंधुदूर्ग :
तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गासह कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता २१ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे येणार आहेत.
यावेळी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांच्या मध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करणार आहेत, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.