550 जाळी गेली वाहून
सिंधुदुर्गनगरी
तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात मोठेच धुमशान घातले. या चक्रीवादळाचा मोठआ फटका मच्छिमारांनाही बसला आहे. जिल्ह्यात एकूण 550 मच्छिमार जाळी वाहून गेल्याचा प्राथमिक आंदाज मत्स्यव्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे. तसेच 33 लहान नौका आणि 4 मोठ्या नौकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मालवण तालुक्यातील मच्छिमारांना सर्वाधित फटका बसला असून तिथे 300 मच्छिमार जाळी वाहून गेली आहेत. तर 15 लहान नौकांचेही नुकसान झाले आहे. तर वेंगुर्ला तालुक्यात 150 जाळी वाहून गेली असून 12 लहान नौकांचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात 100 जाळी वाहून गेली असून 6 लहान नौका आणि 4 मोठ्या बोटींचे नुकसान झाल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आली आले.