You are currently viewing तेरेखोल खाडीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह…

तेरेखोल खाडीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह…

कोणी हरवले असल्यास संपर्क करण्याचे पोलिसांचे आवाहन

तेरेखोल खाडी पात्रात किनाऱ्याजवळ किनळे ख्रिश्चनवाडी येथे अनोळखी मृतदेह सापडला आहे. ख्रिश्चनवाडी येथील श्रीम. वायोलेट पिटर डिसोजा यांचे घराजवळ मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास हा एक अनोळखी मृतदेह निदर्शनास आला. या मृत व्यक्तीच्या शरीराचा बराचसा भाग जलचारांनी खाल्लेला असल्याने सदरचा मृतदेह स्त्री किंवा पुरुष जातीचा तसेच संबधित व्यक्तीचे वय समजून येत नाही. विशेष म्हणजे सदरच्या मृतदेहावर कपडे नसून दोन्ही कानामध्ये वरील बाजूला पिवळसर धातूच्या रींगा आहेत. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणे मुश्कील झाले आहे. यासाठी आपल्या निदर्शनास कुणी व्यक्ती हरवली असल्यास सावंतवाडी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. बाबर यांनी केले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =