You are currently viewing कुडाळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

कुडाळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

वारंगाची तुळसुली येथे नुकसानग्रस्त घरमालकांना केली आर्थिक मदत

आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्याचा दौरा करत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. वारंगाची तुळसुली कालेलकरवाडी येथील राजन सोमा तुळसुलकर व जयश्री जनार्दन तुळसुलकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून दोन्ही घरे पूर्णतः जमीन दोस्त झाली आहेत.याठिकाणी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली व रोख स्वरूपात आर्थिक मदत करत या कुटुंबियांना धीर दिला.
सदर घरांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती आ. वैभव नाईक यांनी जाणून घेतली. नुकसान भरभाईसाठी प्रस्ताव करण्यात आला असून शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

त्याचबरोबर नेरूर दत्तनगर येथील वैष्णवी बोन्द्रे , नेरूर चौपाटी येथील श्री. बेहरे, व अमोल काणेकर यांच्या घराचे नुकसान झाले त्याची पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.
यावेळी सरपंच सूचिता तुळसुळकर, उपसरपंच विजय वारंग, प्रभाकर वारंग, संतोष वारंग, जयसिंग तुळसुलकर, राजन तुळसुलकर, दिनेश तुळसुलकर नेरूर येथे सरपंच शेखर गावडे, मंजुनाथ फडके आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =