You are currently viewing मधमाश्यांच्या हल्ल्यात वीज वितरणचा कामगार गंभीर जखमी

मधमाश्यांच्या हल्ल्यात वीज वितरणचा कामगार गंभीर जखमी

शहरातील वीज खांबावर काम करत असताना घडली घटना

वैभववाडी
मधमाश्यांच्या हल्ल्यात वीज वितरणमधील कर्मचारी रविकांत बाणे हा गंभीर जखमी झाला आहे. येथील शहरात वीज खांबावर काम करत असताना हा प्रकार घडला आहे. जखमी बाणे याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

चक्रीवादळामुळे तब्बल तीन दिवस तालुका अंधारात आहे. शहरातील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी कंपनीकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. वीज वितरण अधिकारी, लाईनमन, वायरमन व कंत्राटी कर्मचारी दिवस-रात्र खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या मदतीला वीज वितरणची कामे करणाऱ्या ठेकेदाराचे कामगार कार्यरत आहेत. या कामगारांपैकी रविकांत बाणे शहरातील सुलभ शौचालय जवळील वीज खांबावर काम करत होता. नजीकच्या आंब्याच्या झाडावर असलेल्या मधाच्या पोळ्यावरील माशांनी बाणे याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत.

वीज वितरण चे उपकार्यकारी अभियंता श्री. सूर्यवंशी, शाखा अभियंता श्री. मुल्ला, लाईनमन गणेश पाटेकर यांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा