तौक्ते वादळामुळे मालवण तालुक्यातील देवबाग, तारकर्ली, मालवण या गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार वैभव नाईक केली. चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांचे बागेचे नुकसान झाले अश्या विविध भागात झाडे कटिंग करण्यासाठी कटिंग मशीन्स आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिल्या. तसेच झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे व लाईट लवकरात लवकर सुरु करण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, मालवण तहसीलदार अजय पाटने, नगरपंचायत मुख्याधिकारी झिरगे, विज महावितरण चे अभियंता गिरकर, शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहर प्रमुख बाबी जोगी उपस्थित होते.