तौक्ते चक्री वादळ जरी भयानक असले तरी या चक्री वादळामध्ये माणूसकीच दर्शन घडलंय. आचरा पारवाडी डोंगरेवाडी प्रकल्पात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी सरसावला, कितीही मोठ वैर असले तरी संकट काळात वैर बाजूला ठेवून मदतीला धावून जातात तिच खरी माणूसकी. याचा प्रत्यय तौत्के वादळात उडालेल्या हाहाकारात आला. आचरा पारवाडी डोंगरे वाडी येथील कोळंबी प्रकल्पामुळे या भागातील जमिन विहीरींचे पाणी क्षारपड होण्याबरोबरच याप्रकल्पामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा धोका होवू शकतो या कारणास्तव या भागातून जोरदार विरोध केला जात आहे. याबाबत प्रकल्प विरोधी समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रारी दाखल करून दाद मागितली जात आहे. पण असे असतानाही रविवारी उधाणाचे पाणी या प्रकल्पात अकस्मात शिरुन प्रकल्पाचे कामगार यात अडकल्याचे समजताच प्रकल्प विरोधी समितीचे दोर साहाय्याच्या मदतीने बाहेर सुखरूप काढण्यात आले. आपले वैर प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीशीच आहे काम करणाऱ्या लोकांशी नसल्याचा प्रत्यय देत प्रकल्प विरोधी लोकांनी दाखवलेल्या माणूसकीतून तीन लोकांना धोकादायक स्थितीतून बाहेर काढले गेले. त्यांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.
आचऱ्यात चक्रीवादळामध्ये “माणुसकीचे दर्शन”
- Post published:मे 17, 2021
- Post category:बातम्या / मालवण
- Post comments:0 Comments