सिंधुदुर्गनगरी
तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे. सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी तालुक्यात 365 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस वैभववाडी तालुक्यात 149 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरी 218 पूर्णांक 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. दोडामार्ग – 250, सावंतवाडी – 265, वेंगुर्ला – 180, कुडाळ – 203, मालवण – 210, कणकवली – 192, देवगड – 199 आणि वैभववाडी – 149 या प्रमाणे पाऊस झाला आहे.