You are currently viewing कणकवलीचे माजी सरपंच सुरेश मांणगावकर यांचे निधन…

कणकवलीचे माजी सरपंच सुरेश मांणगावकर यांचे निधन…

कणकवली

शहराचे माजी सरपंच सुरेश पुंडलिक माणगावकर (वय ८०) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी सुमारे १५ वर्षे शहराचे यशस्वी सरपंचपद त्यांनी भूषवले होते. तथा जनतादल पक्षाचे जेष्ठ नेते होते. तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करणारे तसेच प्रामाणिक संयमि, शांत आणि अबोल असे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. तर त्यांच्याच काळात कणकवली शहरात महत्वाची पाणी योजना यासह इतर महत्वाची छोटी – मोठी कामे मार्गी लागली होती. तसेच सद्याच्या न.पं. मध्ये कार्यरत असणाऱ्या काहीना त्यावेळी त्यांनी नोकरीला लावले होते. त्यांच्या निधनाने जुनं जाणत व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सूना, विवाहित मुली नातवंडे असा परिवार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा